Akshay Khanna : काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षित दृश्यम ३ च्या निर्मात्यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. आता या चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावे समोर आली आहेत. या नावांमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीतून अक्षय खन्नाचे नाव गायब असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. धुरंधरनंतर अक्षय खन्ना चर्चेत आहे आणि म्हणूनच दृश्यम ३ मध्ये त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. महत्वाचे म्हणजे दृश्यम २ (२०२२) मधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयने तिसऱ्या भागातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याची माहिती देखील समोर आली आहे. हे वर्ष अक्षयसाठी खूप खास ठरले आहे. यात काही शंका नाही. त्याने केलेल्या या वर्षातील सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. हे ओळखून त्याने त्याचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याने दृश्यम ३ च्या निर्मात्यांकडून २१ कोटी रुपयांचे मानधनाची मागणी केली आहे. तसेच इतरही गोष्टींवर मतभेत असल्याची माहिती देखील काही मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे. त्यामुळे मानधन आणि इतर काही मागण्या आहेत, त्यावर निर्माते काय ठरवतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. अक्षयने चित्रपटाच्या निर्मात्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मात्यांना आशा आहे की भविष्यात जेव्हा सहमत होईल तेव्हा ते अक्षयसोबत काम करतील. हेही वाचा : रेखाचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल; अमिताभ बच्चन यांचा नातू समोर येताच…; नेमकं काय घडलं होतं?