पनवेल : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खानला सापानं दंश केला आहे. पनवेलच्या फार्महाऊसमधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये सलमान दाखल होता. दरम्यान, आता सलमान वरील संकट दूर झाले असून, त्याला घरी सोडण्यात आलं आहे.
ख्रिसमस तसंच वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांसह पनवेल इथल्या फार्महाऊसला काल आला होता. मध्यरात्री बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.