बिहार निवडणुकीपूर्वी चिराग पासवान यांना मोठा धक्का, पक्षातील ३८ नेत्यांनी सोडली साथ

Bihar Politics | आगामी बिहार निवडणूकीपूर्वी लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. खगडिया जिल्ह्यातील पक्षाच्या अध्यक्षपदात बदल झाल्यानंतर पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
23 जुलै रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांनी मनीष कुमार उर्फ नाटा सिंह यांना खगडिया जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यानंतर पक्षात भूकंप आला आहे. खासदार राजेश वर्मा यांच्या सांगण्यावरून ही नियुक्ती करण्यात आली. याच्या निषेधार्थ 38 नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
नवे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात खासदार राजेश वर्मा यांच्या खडगिया मतदारसंघात एक बैठक आयोजित केली. या बैठकीत लोजपाच्या ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष शिवराज यादव, प्रदेश महासचिव रतन पासवान, युवा जिल्हाध्यक्ष सुजीत पासवान यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
पत्राद्वारे नाराजी व्यक्त
पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अध्यक्षांना एक खुलं पत्र लिहित पदाधिकाऱ्यांनी नाराजी सांगितली आहे. पत्रात म्हटलं की, ‘लोजपाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांचा खडगिया हा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात पक्षातील नेत्यांसोबत चुकीचा व्यवहार केला जात आहे.’ शिवराज यादव यांनी खगडिया येथील खासदार राजेश वर्मा यांच्यावर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला आहे. दुसरीकडे, खासदार राजेश वर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. Bihar Politics |
खगडिया येथील खासदार राजेश वर्मा यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी खगडिया येथील जनतेने निवडलेला खासदार आहे आणि त्यांच्या हितासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन. संघटनेतील बदलाचा निर्णय हा राष्ट्रीय आणि प्रांतिक नेतृत्वाचा विशेषाधिकार आहे लोजपा (रामविलास) नेहमीच मजबूत होता आणि राहील,” असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. Bihar Politics |
पक्षाची कारवाई
माहितीनुसार, शिवराज यादव यांनी अलीकडच्या काळात पक्षाच्या कामांपासून अंतर राखले होते. 19 जुलै रोजी झालेल्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवराज आणि त्यांच्या टीमवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, प्रांतिक नेतृत्वाने शिवराज यांना हटवून मनीष कुमार उर्फ नाटा सिंह यांना खगडिया येथील नवे जिल्हाध्यक्ष नेमले.
हेही वाचा:





