भाजपला मोठा झटका; महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई – वरळी गॅस स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मुंबईच्या महापौरांना 72 तासांनंतर वेळ मिळाला होता, एवढा काळ त्या कोठे झोपल्या होत्या असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान,वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संबंधात भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला होता.
याच प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केलीय. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे पोलीस कधीही आशिष शेलार यांना अटक करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
शेलारांविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे आता मुंबईत आता पुन्हा भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.





