आंध्र प्रदेशच्या जगनमोहन सरकारला मोठा धक्का!

हैदराबाद: आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारला आज मोठा धक्का बसला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने रमेश कुमार यांना राज्य निवडणूक आयुक्तपदावर पुन्हा नियुक्ती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यातील जगनमोहन रेड्डी सरकारला मोठा धक्का बसला आहे.

तामिळनाडूतील सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. कानगराजू यांची नियुक्ती कोर्टाने फेटाळून लावली. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसने राज्य निवडणूक आयुक्तांचा  कार्यकाळ पाच वरून तीन वर्षांपर्यंत कमी करण्यासाठी पंचायत राज कायद्यात सुधारणा करण्याचा अध्यादेश काढला, तोही नाकारला गेला आहे.

वायएसआर कॉंग्रेसचे सरकार वादग्रस्त परिस्थितीत एन. रमेश यांना हटविले होते. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने रमेश यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा आठवड्यांपर्यंत तहकूब केल्यावर त्यांना दूर करण्यात आले होते.

मद्रास उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. कानगराज यांना नवीन राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा सरकारी आदेशही कोर्टाने फेटाळला. कोर्टाने राज्य निवडणूक आयुक्त (एसईसी) म्हणून एन. रमेश कुमार यांना पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे न्यायमूर्ती कानगराज यांनी 11 एप्रिलला एसईसी म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.