नाशिक पोलिसांची मोठी कारवाई ! 2 गांजा तस्करांना अटक
Updated On:

नाशिक : थायलंड येथून आयात केलेल्या गांजाची विक्री करणार्या दोघांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशाल वसंत बावा-गोसावी (वय २५, रा.नवजीवन शाळेसमोर, सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, शिवशक्ती चौक, नाशिक), लविन महेश चावला (२६, रा. सतनम बंगलो, इनायत कॅफे हॉटेलचे मागे, इंदिरानगर, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गांजा विक्रेत्यांची माहिती मिळाली. दोघे जण थायलंड येथून आलेला २ लाख २४ हजारांचा ६८६ ग्रॅम वजनाचा गांजा विक्री करणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना आणखी कोणासोबत गांजातस्करी केली आहे, याप्रकरणात किती किलो गांजा आहे, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस करीत आहेत.





