Ahilyangar News | राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी दरम्यान एका वाहनातून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनावर काटेकोर पाळत ठेवली जात आहे. यादरम्यान आयोगाच्या पथकाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक वाहन थांबवून तपासणी केली. तसेच वाहनातील सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अधिकाऱ्यांना वाहनातील व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपासादरम्यान, वाहनातून मोठी रोकड आढळताच पथकाने तत्काळ ती जप्त केली. याप्रकरणी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती, याबाबत तपास केला जात आहे. सध्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. Ahilyangar News | विशेष पथके तैनात निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, महागड्या वस्तू किंवा इतर साहित्य मतदारांपर्यंत पोहोचवून मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याबाबत अनेक तक्रारी देखील नोंदवल्या जातात. त्यानुसारच आयोगाने या निवडणुकीत विशेष पथके तैनात केली आहेत. त्या अनुषंगाने पुढील काही दिवस तपासणी अधिक कडक राहणार आहे. Ahilyangar News | हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय ! अनेक गोष्टींवरील शुल्क हटवले ; कोणाच्या दबावाखाली घेतला निर्णय?,वाचा