Bibvewadi Murder Case – चारित्र्याचा संशय घेऊन पतीने बेदम मारहाण करून महिलेचा खून केल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. सारिका शुभम घोडके (२३, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती शुभम श्रीकांत घोडके (२९) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (५०, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर) यांनी बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम अंबिकानगर भागात राहायला आहे. तो पत्नी सारिकाच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करायचा. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पतीने सारिकाला कठीण वस्तूने मारहाण केली. मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पसार झालेला आरोपी पती शुभम याला पोलिसांनी अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.