Bhupendra Patel : माजी अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 20 टक्के आरक्षण मिळणार; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची मोठी घोषणा
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील वर्ग-३ च्या विविध थेट सरकारी नोकरभरतीमध्ये माजी अग्निवीरांना (Bhupendra Patel) २० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांना वयोमर्यादेत सूट आणि शारीरिक चाचणीतून सूटही दिली जाईल.

Bhupendra Patel : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील वर्ग-३ च्या विविध थेट सरकारी नोकरभरतीमध्ये माजी अग्निवीरांना (Bhupendra Patel) २० टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यासोबतच त्यांना वयोमर्यादेत सूट आणि शारीरिक चाचणीतून सूटही दिली जाईल.
राज्य पोलीस दलाची सशस्त्र शाखा, स्टेट रिझर्व्ह पोलीस, कारागृह आणि वन विभागामध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या माजी अग्निवीरांना (Bhupendra Patel) या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे.
या भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या फायद्यासोबतच, माजी अग्निवीरांना निश्चित करण्यात आलेल्या शारीरिक क्षमता चाचणीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार या भरतीसाठीच्या (Bhupendra Patel) कमाल वयोमर्यादेत माजी अग्निवीरांना ३ वर्षांपर्यंतची सूट दिली जाईल. तर, अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंतची सूट मिळण्यास पात्र असणार आहेत, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना लष्कर, नौदल आणि वायुदलात ४ वर्षांच्या कालावधीसाठी (ज्यामध्ये लष्करी प्रशिक्षण आणि सक्रिय सेवेचा समावेश आहे) अग्निवीर म्हणून भरती केले जाते.






