Bhumi Pednekar : “मला तुझी खूप आठवण येते…”; भूमी पेडणेकरकडून सुशांत सिंहच्या आठवणींना उजाळा
Bhumi Pednekar : शेअर केली भावनिक पोस्ट

Bhumi Pednekar : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून त्याला आदरांजली वाहिली जात आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.
सुशांत आणि भूमी यांनी अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘सोनचिरीया’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर करत भूमीने सुशांतसाठी एक अत्यंत भावुक पोस्ट लिहिली. भूमी पेडणेकरने ‘सोनचिरीया’ चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या शुटिंगदरम्यानचा सुशांतसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले, “मला तुझी खूप आठवण येते. काय अप्रतिम प्रतिभा, काय अद्भुत अभिनेता… सुशांत एक अत्यंत विचारशील व्यक्ती होता, जो तितकाच मनोरंजक, उत्साही आणि प्रतिभावान होता. हा फोटो ‘सोनचिरीया’च्या टायटल ट्रॅकच्या शूट वेळचा आहे… या किती सुंदर आठवणी आहेत”. भूमीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Bhumi Pednekar)
सुशांत सिंह राजपूतचे चित्रपट (Bhumi Pednekar )
भूमी पेडणेकर आणि सुशांत सिंह राजपूत यांचा ‘सोनचिरीया’ हा चित्रपट अभिनेत्याच्या निधनाच्या एक वर्ष आधी रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी यशस्वी ठरला नसला, तरी समीक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ रिलीज झाला, जो थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आणि आपल्या १२ चित्रपटांच्या प्रवासातून त्याने चाहत्यांच्या मनात कायमचे घर केले.
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्याच असल्याचे स्पष्ट (Bhumi Pednekar )
१४ जून २०२० रोजी सुशांत मुंबईतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले, परंतु त्याच्या कुटुंबाने हत्येची शंका व्यक्त केली होती. मात्र, अनेक वर्षांच्या तपासानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) क्लोझर रिपोर्ट दाखल करत ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. Bhumi Pednekar
हेही वाचा:






