पुणे जिल्हा | भोर मांढरदेव रस्ता चिखलात, रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात वाढ

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर मांढरदेव रस्त्याचे काम गेले सहा सुरू आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला रस्ता गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने चिखलमय झाला आहे. या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेले सहा महिने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे. अनेक वेळा रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहे.
गेले दोन दिवस वीसगाव खोऱ्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्याने भोर मांढरदेव रस्तावर चिखल तयार झाल्याने अपघात होत आहेत. प्रवाश्यांना आपली दुचाकी रस्त्यावर चालवताना कसरत करावी लागत आहे. चिखल मोठ्या प्रमाणात असल्याने दुचाकीच्या चाकांना चिखल चिकटून अपघात होत आहे.
नागरिक लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याची मागणी करीत आहेत. भोर तालुक्यातील भोर मांढरदेव रस्त्यावर ठिकठिकाणी माती साठून चिखल झाल्याने प्रवासी, विद्यार्थ्यी, कामगार यांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे.





