भोर-महाड रस्ता वाहतुकीस बंद

संरक्षक भिंत कोसळली : भोर बांधकाम विभागाची माहिती

भोर – भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वाघजाई मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर महाड तालुक्‍याच्या हद्दीत बंद असलेल्या रस्त्यालगतची उतरणीच्या मार्गावरील संरक्षक भिंत गुरुवारी (दि.13) सायंकाळी कोसळली. रस्ता वाहतुकीस बंद झाल्याची माहिती भोरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हल्लाळे यांनी दिली. यंदा ऑगस्ट महिन्यातच पावसाचा जोर वाढला असून घाट मार्गावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

 

सध्या चार दिवसांपासून भोर व महाड तालुक्‍यात संततधार पाऊस कोसळत असून वरंधा घाटात जोरदार तीव्रता सुरू आहे. त्यामुळे घाटात दरडी कोसळत असून मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता आर. एल. ठानगे यांनी केले आहे.

 

 

भोर- महाड रस्त्याचे कामासाठी 9 कोटी 72 लाख रुपये मंजूर असून मागील वर्षी या मार्गावरील काही अंशी काम करण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने केलेला रस्ता वाहून गेला होता. अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने काही काळ रस्ता वाहतुकीस बंद होता.

Leave A Reply

Your email address will not be published.