20 वर्षीय मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी काढला 16 किलोचा ‘ट्युमर’, डाॅक्टर म्हणाले…

भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये एका खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक मोठी सर्जरी केली आहे. या डॉक्टरांनी एका मुलीच्या पोटातून 16 किलो वजनाचा ट्युमर बाहेर काढला आहे. डॉक्टरांनी रविवारी 6 तास चालल्या सर्जरीनंतर 20 वर्षीय मुलीच्या पोठातून 16 किलोचा ट्युमर बाहेर काढला.
मुलीचे वजन 48 किलो आणि ट्युमरचे वजन 16 किलो
हॉस्पिटलच्या मॅनेजर देवेंद्र चंदोलियांनी सांगितले की, ‘मुलीच्या गर्भाशयाच्या जवळ ट्युमर होता आणि सर्जरी यशस्वीपणे पार पडली. त्याचबरोबर आता त्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.’ त्यांनी सांगितली की, ती मुलगी मध्यप्रदेश मधील राजगढ़ येथील रहिवासी आहे आणि दोन दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती.
तिचा ट्युमर खूप मोठा होता. त्यामुळे जेवन करण्याबरोबरच तिला चालताना ही त्रास होत होता. या ट्युमरला डिम्बग्रंथि ट्युमर (Ovarian Tumour) म्हणून ओळखले जाते. या मुलीचे वजन 48 किलो आणि तिचा ट्युमर 16 किलोचा होता.’
वेळेत ऑपरेशन झाले नसते तर धोका वाढला असता
देवेंद्र चंदोलिया यांनी सांगितले की, ‘जर वेळेत ट्युमर काढला नसता तर धोका वाढला असता. त्याचबरोबर मुलीच्या पोठातून सर्जरी करुन ट्युमर काढण्याची शक्यता कमी झाली असती. त्यांनी सांगितले, सर्जरी जवळपास 6 तास चालली. त्यामुळे आता या मुलीला कोणताही धोका नाही.’





