पिंपरी | देहूरोड येथे रस्त्याचे भूमिपूजन
Updated On:

देहूरोङ, ( वार्ताहर ) – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बँक ऑफ इंडिया , स्व. गोपीनाथराव मुंडे चौक ते संकल्पनगरी दरम्यान रस्त्याचे भूमिपूजन शहर राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून देहूरोड कॅन्टोमेट हद्दीतील परिसरामध्ये सुमारे २२ कोटीचे विकासाची कामे सुरू आहेत. त्यातील सुमारे ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
शहराध्यक्ष अॅड. प्रवीण झेंडे, बाळासाहेब जाधव, विजय पवार, नंदकुमार काळोखे, सुभाष चंडालिया, प्रीति नारायण, राजेंद्र दाभाडे, धनाजी दिंडे, अशपाक शेख यांच्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके युवा मंचचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.





