कर्जत – कर्जत तालुक्यातील पाषाने,खांडस,कशेळे, पोशीर,खांडपे, या गावातील विकासकामांचे भूमिपूजन तसेच माजी आमदार सुरेश लाड यांचा सत्कार समारंभ,तसेच असंख्य तरुणांचा भव्य पक्ष सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी 1 रोजी शेळके हॉल येथे होणार आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कर्जत खालापूर मतदारसंघात पक्षातील बड्या नेत्यांचे दौरे चालू झाले आहेत त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होताना दिसत आहे. राजकीय घडामोडी लक्षात घेता मंत्री रविंद्र चव्हाणदेखील सोमवारी कर्जत दौर्यावर आहेत. त्याचबरोबर मंत्री शैलेंद्र दळवी, पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, उरण आमदार महेश बालदी, पेण आमदार रविंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार धैर्यशील पाटील प्रदेश चिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल कालसेकर, रायगड लोकसभा प्रमुख सतिश धारप आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कर्जत खालापूरचे राजकारण चांगलेच तापणार असून राजकीय चर्चेला उधाण येणार असल्याचे बोलले जातआहे लाडांसोबत आणखी कोण? काही दिवसांपूर्वी भाजपवासी झालेले कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या बरोबर सोमवारी 1 रोजी शेळके हॉल येथे होणार्या पक्ष प्रवेश सोहळ्याला त्यांच्यासोबत कोण असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पक्ष बळकटीसाठी अधिकचा भर दिला असून नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत तालुक्यातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. तर ठाकरे 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा रंगली आहे.