निवडणुकीत भोंगा वापरणार नाही
Updated On:

अकोला – राज्यात भोंग्यावरून रण तापले असताना अकोल्याचे पालकमंत्री बच्च कडू यांनी स्तुत्य भूमिका घेतली आहे. आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय लढणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. तसेच भोंग्याचा वाद सामोपचारानेच मिटू शकतो, वाद करून मिटणार नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात तणावाचे वातावरण नाही. तणाव निर्माण करणारी एकही घटना घडलेली नाही. काम में कुछ नहीं, बातों में बहोत है अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारांनी राज्याचे किंवा देशाचे फार चांगले काही होणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.





