Pune District : सासवड नगरपालिका कामगार सोसायटीच्या अध्यक्षपदी भोंडे
Pune District : सासवड नगरपालिका सोसायटीच्या उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र बोरावके यांचे सर्वानुमते नाव सुचविण्यात आले. त्यामुळे त्यामुळे सहायक निबंधक तथा अध्यासी यशवंती मेश्राम यांनी उपाध्यक्षपदी राजेंद्र बोरावके यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

सासवड : सासवड नगरपालिकेच्या कामगार को. ऑप. क्रे. सोसायटीची निवडणूक सहाय्यक निंबधक श्रीमती यशवंती मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अध्यक्षपदासाठी प्रमोद भोंडे व ज्ञानेश्वर जगताप असे दोन अर्ज दाखल झाले. निवडणूक प्रक्रियाच्या माघारीच्या वेळेमध्ये कोणीही माघार न घेतल्याने अध्यक्षपदासाठी प्रमोद भोंडे व ज्ञानेश्वर जगताप यांचे अर्ज वैध राहिल्याने दोघांमध्ये सरळ लढत झाली.
मतदान प्रक्रिया ही चिठ्ठयाव्दारे करण्यात आली. त्यामध्ये प्रमोद भोंडे यांना १३ मते व ज्ञानेश्वर जगताप यांना १ मत मिळाले. त्यामुळे सहायक निबंधक तथा अध्यासी सासवड नगरपालिका कामगार सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रमोद भोंडे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
सासवड नगरपालिका सोसायटीच्या उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र बोरावके यांचे सर्वानुमते नाव सुचविण्यात आले. त्यामुळे त्यामुळे सहायक निबंधक तथा अध्यासी यशवंती मेश्राम यांनी उपाध्यक्षपदी राजेंद्र बोरावके यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
कामगार सोसायटीचा कारभार हा पारदर्शक व सर्व संचालकाच्या सहकार्याने चालविण्यात येईल. कामगार सोसायटीच्या सभासदांसाठी आवश्यक ती सर्व मदत व अडचणी सोडविण्यास आम्ही प्रयत्नशील राहू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद भोंडे व उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. यावेळी सासवड नगरपालिका कामगार सोसायटीचे संचालक सोपान जगताप, मोहन चव्हाण, विकास राठोड, काळूराम भोंडे, राजेंद्र निरगुडे, सुमित साबळे, जितेंद्र रणपिसे, धनराज जाधव, सविता जगताप, संगिता जाधव, आशा रणपिसे, सोसायटीचे सचिव तुकाराम जगताप, निलेश भोंडे उपस्थित होते.





