Bhojshala Complex : धार भोजशाळा मंदिर (Bhojshala Complex) अर्थात कमल मौला मशीद वाद प्रकरणात उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने भोजशाळा परिसराला हिंदू मंदिर म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकरणी न्यायालयाने मुस्लिम समाजाच्या याचिका फेटाळल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालावर अवलंबून न्यायालयाने हा निर्णय दिला. भोजशाळा (Bhojshala Complex) प्रकरणातील न्यायालयाच्या निकालाने या परिसराला देवी वाग्देवीला समर्पित मंदिर म्हणून मान्यता दिली आहे. यापूर्वी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने न्यायालयाला २,१०० पानांचा सविस्तर अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला, तर मुस्लिम पक्षाने तो चुकीचा असल्याचे सांगून फेटाळून लावला. ९८ दिवसांच्या सर्वेक्षणानंतर तयार झालेल्या या अहवालानुसार, उत्खननादरम्यान मूर्ती, नाणी आणि असंख्य ऐतिहासिक अवशेष सापडले. परमार काळातील इमारतीच्या (Bhojshala Complex) पायाच्या दगडांवर नंतर बांधकाम करण्यात आले. Bhojshala Complex शिवाय, सर्वेक्षणादरम्यान सापडलेले स्तंभ आणि वास्तुकला असे सूचित करतात की, ते कदाचित मंदिराचा भाग असावेत आणि नंतर मशिदीच्या बांधकामात वापरले गेले. संकुलाच्या चारही दिशांना मिळून १०६ उभे आणि ८२ आडवे स्तंभ, असे एकूण १८८ स्तंभ आढळले. या स्तंभांवर कोरलेल्या देवता आणि मानवी आकृत्या नंतर अवजारांमुळे खराब झाल्या. पोलिस सतर्क प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी हाय अलर्टवर आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर, धार जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. संपूर्ण शहराचे पोलीस छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. विशेष कृती दलासह (एसटीएफ) सुमारे १,२०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी अत्यंत सतर्क आहेत.