भिवंडी : भिवंडीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. सरवली पाडा, टेमघर पाडा, सोनाळे, भादवड इत्यादी गावात दोन ते तीन सेकंद कंपन जाणवल्याचे समजत आहे. जमीन हादरल्याचे झटके जाणवल्याने गावातील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. तहसीलदारांनी दिली माहिती कंपन नक्की कशाचे होते हे अजून स्पष्ट नसल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. याबाबत हैदराबाद येथे रिपोर्ट पाठवून माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले.