जलवाहिनी फुटल्याने भिंगारचा पाणीपुरवठा विस्कळीत

नगर – नगर शहर पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी २ सप्टेंबर रोजी देहरे शिवारात फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असले तरी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
त्यामुळे ३ सप्टेंबर रोजी सकाळी पाणी वाटप सुरू असलेल्याभिंगार,गवळीवाडा परिसर या नागरी भागास पाणी पुरवठा करता येणार नाही. या भागास जलवाहीनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येणार आहे.
तसेच ४ सप्टेंबर रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच भिंगार , गवळीवाडा , माळगल्ली या भागास ४ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही खबरदारीन घेतल्याने सदरची त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. ठेकेदार कंपनीने याबाबत खबरदारी घेऊन पुढील काम करावे, अशा सूचना छावणी परिषदने केला आहे.





