पिंपरी | आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात भीमशक्तीचे आंदोलन

पिंपरी, (प्रतिनिधी) – खासदार राहूल गांधी यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर भिमशक्ती युवक आघाडीच्या वतीने आंदढ़िोलन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर स्मारक येथे भिमशक्ती युवक संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध व जोडे मारो आंदोलन करण्यात आले.भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानेहे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, भिमशक्ती मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद रणदिवे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू अण्णा दहीतुले,
शहर उपाध्यक्ष हरीश डोळस, काँग्रेस परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वाती शिंदे, युवक उपाध्यक्ष प्रतिभा बनसोडे, सरचिटणीस कपिल डोळस, भोसरी विधानसभा सचिव सुनील कांबळे,
शहर महासचिव विकी पासोटे, काँग्रेस उद्योग विभागाच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रतिभा कांबळे, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ,
गौरी शेलार, प्रमोद शेलार, काँग्रेस व्यापारी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अमरजीत सिंग पोथीवाल, मोहसीन भाई शहा, पॅन्थर युवा मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ ठोके आदी सहभागी झाले होते.





