Nagar | भीमराव फुंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

पाथर्डी, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार ,आमदार तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याहस्ते फुंदे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फुंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदार मोनिका राजळे यांचा प्रचार केला होता.फुंदे पुन्हा स्वगृही परतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
जुन्या कार्यकर्त्यांसह तरुणांना बरोबर घेऊन अजित पवार व आमदार शिवाजीराव गर्जे यांचे हात बळकट करण्यासाठी नव्या जोमाने तालुक्यात पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे फुंदे यांनी सांगितले.





