पुणे जिल्हा । दरड कोसळल्याने भीमाशंकर राजगुरुनगर रस्ता दोन्ही बाजूने बंद

रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर : राजगुरुनगर – भीमाशंकर महामार्गवर शिरगाव च्या हद्दीत मोरोशी फाट्यानजीक दरड कोळसाळयाने भीमाशंकर राजगुरूनगर रस्ता दोन्ही बाजूने बंद झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही हि घटना आज (दि.२५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ४ तास होवूनही प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी अजूनही पोहचली नाही.
भोरगिरी भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहेत त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आला आहे. याच परिसरात शिरगाव गाव असून तेथील डोंगराचा काही भाग तुटून रस्त्यावर आला आहे या परिसरात पर्जन्यमापन केंद्र नसल्याने किती पाऊस झाला याची नोंद सरकारी दरबारी होत नसल्याने अनेकदा अतिवृष्टी होऊन सरकारी यंत्रनेला माहिती मिळत नाही तर स्थनिकांना आणि मदत मिळत नाही. या परिसरात सुमारे ५ हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र ३० किमी अंतरावरील वाडा येथील महसूल विभागाच्या पर्जन्यमापन केंद्राची नोंद शासन घेते.
त्यामुळे पावसाळ्यातील आपत्तीचीच्या काळात या परिसरात काय घटना घडतात त्याची नोंद होत नाही
याबाबत स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगर – भीमाशंकर महामार्गवर शिरगाव च्या हद्दीत मोरोशी फाट्यानजीक पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या डोंगराराचा काही भागखाली आला. सुमारे ५० मीटर लांब रस्त्यावर आला आहे दोन्ही बाजूकडून रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर दगड मातीचे मोठे ठिगारे, झाडे आले आहेत रस्त्यालगत असलेले विजेचे खांब पडले असून तारा लोंबकळल्या आहेत त्यामुळे जीवित हानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरड कोसळल्या ठिकाणी जनावरांचा गोठा होता. या गोठ्यात चार जनावरे होती सुदैवाने ती वाचली ग्रामस्थानी या जनावरांना बाहेर काढले आहे.
अशोक लांघी स्थानिक नागरिक म्हणाले कि, माझ्या गोठ्यावर दरड कोसळली. त्यावेळी गोठ्यात जनावरे होती. त्यातील दोन शेळ्या जखमी झाल्या आहेत.पाण्याची बोअरवेल मातीने गाडली आहे.सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
सुभाष मडके यांनी सांगितले, शिरगाव गावाच्या हद्दीत मोरोशी फाट्याजवळ आज पहाटे दरड कोसळली आहे. दोन्ही बाजूने राजगुरूनगर भीमाशंकर रस्ता बंद झाला आहे. जवळपास ५० मीटर रस्त्यावर माती दगड झाडे आली आहेत. त्यामुळे पहाटे पासून रास्ता बंद आहे.केवळ एका बाजूने ठिगारा हलविण्यासाठी पर्याय आहे जवळच भीमा नदी आहे नदीला आला आहे. यंत्रणा येण्यासाठी उशीर होणार आहे.
नारायण नागरे यांनी सांगितले भीमाशंकरकडे जाणारा रस्ता दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडून बंद आहे त्यामुळे नागरिकांनी वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा डेहणे बाजूकडून शेंदुरली पुलाचा वापर करून मोरोशी फाट्याजवळून पुढे जावे तर भीमाशंकर बाजूकडून जाणाऱ्या नागरिकांनी मोरोशी फाट्यावरून चिखलगाव शेंदुर्ली या दोन पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शिरगावचे पोलीस पाटील दादाभाऊ शिर्के यांनी सांगितले, दरड कोसळल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी वीज खांब पडले आहेत तारा लोंबकळत आहेत मात्र त्यातील विद्युत प्रवाह सुरु आहे तो बंद करावा जेणेकरून अपघात होणार नाही. कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शिरगाव हद्दीत याच ठिकाणी नेकलेस धबधब्याच्या अलीकडे ७ जुलै २०२२ साली दरड कोसळली होती त्यामुळे काही काळ रास्ता बंद होता.त्या ठिकाणच्या शिरगाव बाजूकडे आज (दि.२५) रोजी पुन्हा दरड कोसळली त्यात मोठा राडारोडा रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला आहे प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याने आज पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. खडकापासून डोंगराचा भाग कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे.
तालुक्यातील भीमाशंकर जवळील पदरवाडी ग्रामस्थांचा जीव टांगणीला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक स्वतःहून घरदार सोडून तात्पुरते भीमाशंकर येथे आलेआहेत मात्र काही जनावरे आणि माणसे वाडीत आहेत. मागील वर्षी येथे सुमारे तीनशे मीटर जमिनीला सुमारे १० फूट खोल भेगा पडल्या आहेत त्यामुळे येथे दरड खाली जाण्याची भीती आहे. तात्पुरते स्तलांतर करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्च २०२४ ला देण्यात आले होते मात्र त्यावर कारवाई झाली नाही.अतिवृत्तीमुळे येथील धोका वाढला आहे.





