पुणे जिल्हा | भिगवण-बारामती सायकल रॅली उत्साहात
Updated On:

भिगवण, (वार्ताहर) – येथील सायकल क्लबच्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. यावेळी एक दिवस स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांसाठी या हेतूने देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भिगवण सायकल क्लबच्या वतीने भिगवण- बारामती,
बारामती-भिगवण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती.
बारामती येथील नक्षत्र गार्डन या ठिकाणी तेथील रोटरी क्लब व आयर्न मॅन सतिश ननवरे व राजेंद्र ठवरे यांचे वतीने सायकल क्लबच्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
भिगवण रोटरी क्लबच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देऊन सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले.





