भवानी पेठेतील सराईतचा कोंढव्या खून
Updated On:

पुणे- भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खून करण्यात आला आहे. दूरचित्रवाणीसाठी लागणारे डिश अँटिना दुरुस्तीचे काम तो तरूण करायचा. अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली. खुनाचा हा प्रकार प्रेमसंबंधातून घडलाअसण्याची शक्यता कोंढवा पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान खून झालेल्या व्यक्तीवर खडक पोलीस ठाण्यात चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत. याबरोबरच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
टॅग्स:





