Bhausaheb Jadhav : गेल्या पाच दशकांपासून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या मराठवाडा मित्र मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी प्राचार्य भाऊसाहेब जाधव (Bhausaheb Jadhav) यांची, तर सरचिटणीसपदी किशोर मुंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पाच वर्षांच्या कालखंडासाठी नवीन कार्यकारी मंडळाची एकमताने घोषणा करण्यात आली. संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. माधवराव सूर्यवंशी (कार्याध्यक्ष), अण्णासाहेब पवार (उपाध्यक्ष), संजय गर्गे (उपाध्यक्ष), भाऊसाहेब देशमुख (उपकार्याध्यक्ष), प्रियांका गणगे (कोषाध्यक्ष), जितेंद्र पवार (सहचिटणीस), डॉ. आसावरी देशमुख (सहचिटणीस) यांचा समावेश आहे. डॉ. विश्वास पाटील, डॉ. सखाराम गव्हाणे, प्रा. द्वारकादास भंडारी, तेज निवळीकर, संजय सूर्यवंशी, सत्यजित जाधव, रोहन रावस, असित मुंगळे आणि नरेंद्र जाधव यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे अशी माहिती संस्थेचे रजिस्टार एस. एन. कदम यांनी दिली. Bhausaheb Jadhav मराठवाड्यातील (Bhausaheb Jadhav) ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने ५० वर्षांपूर्वी एका वसतिगृहापासून या संस्थेचा प्रवास सुरू झाला होता.नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी या संस्थेत वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सुरुवातीला काम पाहिले. गेल्या ४० वर्षांत त्यांनी आपल्या कल्पक नेतृत्वात डेक्कन जिमखाना, कर्वेनगर, काळेवाडी आणि लोहगाव यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी संस्थेच्या विविध विद्याशाखा आणि भव्य संकुले उभी केली. आज पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात (Bhausaheb Jadhav) मराठवाडा मित्र मंडळाने जो लौकिक मिळवला आहे, त्यात जाधव यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला आता नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.