शेवगाव – शेवगाव पंचायत समिती गणाच्या आरक्षण सोडती आज सोमवारी उपजिल्हाधिकारी तथा निरीक्षक अतुल चोरमारे यांचे उपस्थितीत तहसीलदार आकाश दहाडदे यांचे अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बहुतेक सर्व आरक्षण मातबरांना सोयीचे आणि दिलासा देणारे पडल्याचे चित्र आहे. गट आणि गण यांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रारंभी तालुक्यात आठ गणांपैकी अनुसुचित जातीच्या मतदारांची सर्वाधिक संख्या भातकुडगाव गणात असल्याने भातकुडगावला अनुसूचित जाती सर्वसाधारणचे आरक्षण सोडत न काढता जाहीर करण्यात आले. निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, मंडल अधिकारी आव्हाड, सहाय्यक सुरेश बर्डे यांनी प्रक्रिया पार पाडली . अहिल्यानगर येथे जिल्हा परिषद गटाच्या सोडतीत दहिगावने सर्वसाधारण, बोधेगाव सर्वसाधारण , भातकुडगाव अनुसूचित जाती महिला, लाडजळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याप्रमाणे जाहीर झाले आहे. बहुतेक सर्व आरक्षण सर्व मातबरांना सोयीचे आणि दिलासा देणारे पडल्याचे चित्र आहे. .मोनिका राजळे यांच्याविरोधात माजी नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मंडळातच मुख्य लढती होतील. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले यांचा दहिगाव ने गट हा सर्वसाधारण झाला आहे. तो त्यांच्या पथ्यावर आहे. लाडजळगाव गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व सुवर्णा राजेंद्र दौंड यांना दिलासा मिळाला आहे. बोधेगाव गट सर्वसाधारण प्रवर्गाला पडल्याने आपल्या हक्काच्या मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे निवडणुकीत उभे राहतील. माजी सभापती रामनाथ राजपुरे ही राष्ट्रवादी (घुले) कडून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. माजी सभापती डॉ.क्षितिज घुले यांचा दहिगावने गण महिलांसाठी राखीव झाल्याने राजकीय अडचण झाली आहे. बहुधा यावेळी ते जिल्हा परिषद लढवतील, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा होरा आहे. भातकुडगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला असल्याने या गटात इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्याचा मोठा फटका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुकांना बसला आहे.गट आणि गण यांचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आ.मोनिका राजळे यांनी पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर घुले बंधूंना सत्ता कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे . शेवगाव पंचायत समिती गणाचे एकूण आरक्षण : दहिगाव ने – सर्वसाधारण महिला, घोटण – सर्वसाधारण, मुंगी – सर्वसाधारण महिला, बोधेगाव – सर्वसाधारण महिला, भातकुडगाव – अनुसूचित जाती सर्वसाधारण, अमरापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, खरडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लाडजळगाव गण- सर्वसाधारण