IIT Madras : विद्यार्थ्यांनी विकसित केली नवी ‘BharOS’ मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम

नवी दिल्ली – मद्रास आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी स्वदेशी तंत्राने ‘भारोस’ नावाची नवी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम (IIT Madras develops indigenous mobile operating system BharOS) विकसित केली असून आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांनी या तंत्राची यशस्वी चाचणी घेतली.
प्रधान यांनी या तंत्राचे कौतुक केले असून या स्वदेशी, विश्वासार्ह डिजीटल व्यवस्थेचा देशातील गरीब लोकांना अधिक लाभ होईल आणि हे डेटा गोपनीयतेच्या दिशेने एक यशस्वी पाऊल आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ही प्रणाली व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ हॅंडसेटवर स्थापित केली जाऊ शकते. भारोसच्या सेवा सध्या अशा संस्थांना पुरवल्या जात आहेत ज्यांना मोबाइल डाटाची कठोर गोपनीयता आणि सुरक्षितता आवश्यक आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/delhi-mayor-election-postponed-again-after-ruckus-between-aap-bjp-councillors/
एखाद्याला एखादे ऍप घ्यायचे नसेल तर त्याचा या नेटवर्कवर आग्रह धरला जाऊ शकत नाही. म्हणजेच ही प्रणाली कोणत्याही डीफॉल्ट ऍप्ससह येत नाही.


