भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र अर्धवट ! -अजित पवार

पुणे: महाआघाडीचा जाहीरनामा हा सर्व समाजघटकांचा विचार करून बनवलेला आहे. भाजपाचा जाहीरनामा हा अर्धवट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते आकुर्डी येथे आले होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी यांचा उल्लेख नाही. सरकारच्या याच निर्णयांमुळे देशवासियांचे कंबरडे मोडले आहे. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विकासाबाबत बोलत नाहीत, त्यांनी यावेळी प्रचारासाठी भलतेच वैयक्तिक मुद्दे शोधले आहेत. त्यामुळे आता परिवर्तन करणे गरजेचे आहे. आपल्याला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, म्हणून गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.