स्पोक नसलेले टायर! ‘ही’ हटके इलेक्ट्रिक सायकल पाहून पंतप्रधान मोदीही झाले चकित, पाहा व्हीडिओ

Helex Electric Bicyle: सध्या दिल्लीमध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो सुरू आहे. या एक्स्पोमध्ये सोलर इलेक्ट्रिक कारपासून ते सीएनजी स्कूटरपर्यंत अनेक हटके वाहनांना सादर करण्यात आले आहे. यासोबतच एक्स्पोमध्ये एक हटके इलेक्ट्रिक सायकल देखील सादर करण्यात आली आहे. Helen Bikes नावाच्या स्टार्टअपने स्पोक नसलेल्या टायरसह येणारी हटके इलेक्ट्रिक सायकल सादर केली.
Helen Bikes च्या या इलेक्ट्रिक सायकलचे नाव ‘Helex’ असे आहे. या हटके इलेक्ट्रिक सायकलला बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पोहोचले होते. या एक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या वाहन निर्मात्यांच्या स्टॉलला भेट देत, उत्पादनांविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांनी स्पोकशिवाय येणाऱ्या ‘Helex’ या इलेक्ट्रिक सायकलविषयी देखील जाणून घेतले.
View this post on Instagram
Helen Bikes स्टार्टअपने सोशल मीडियावर एक व्हीडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सायकलविषयी जाणून घेताना दिसत आहेत.
Helex इलेक्ट्रिक सायकलची वैशिष्ट्ये
कंपनीचा दावा आहे की, ही जगातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक हबलेस सायकल आहे. यामध्ये रिम-स्पोक्स नाहीत. तसेच, चालवण्यासाठी पेडल्सचीही गरज नाही. आवश्यकता नसते. सायकलची चाके मध्यभागी पूर्णपणे रिकामी आहेत. यातील इलेक्ट्रिक मोटर व्हील आणि फ्रेममध्येच देण्यात आली आहे. बॅटरी देखील सायकलच्या फ्रेममध्येच आहे.
या इलेक्ट्रिक सायकलमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, हायब्रीड पेडल मोटर, नेव्हिगेशन असिस्टंट, थ्री-स्टेज अँटी थेफ्ट अलार्म, ड्युअल सस्पेंशन, फिंगरप्रिंट स्कॅनर यासारखे फीचर्स दिले आहेत.दरम्यान, हे केवळ इलेक्ट्रिक सायकलचे एक प्रोटोटाइप मॉडेल आहे. सायकल कधी लाँच होईल व ग्राहक कधीपर्यंत खरेदी करू शकतील, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.





