Mahad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता शिंदे गटाचे नेते आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गोगावले यांचा विजय झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्नेहल शिंदे यांचा त्यांनी पराभव केला आहे. भरत गोगवले यांना एकूण 1,16,696 मते पडली असून स्नेहल शिंदे यांचा त्यांनी 25,995 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजय मिळवत गोगवले यांनी शिंदे गटाला मोठा विजय मिळवून दिला आहे. महाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तर स्नेहल शिंदे यांचा पराभव करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, 2019 मध्ये भरत गोगावले यांचा 94,408 मतांनी विजय झाला होता. काँग्रेसच्या माणिक जगताप यांना त्यांनी पराभूत केलं होतं. तर 2009 आणि 2014 मध्येही भरत गोगावले या मतदारसंघाचे आमदार होते. Mahad Assembly Election 2024 | तर ठाकरे गटाच्या उमेदवर स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्षा आहेत. या आधी त्या काँग्रेसच्या सरचिटणीसपदी कार्यरत होत्या. त्यांचे वडील माणिकराव जगताप हे माजी आमदार होते. काही काळापूर्वी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटातील भरत गोगावले यांना जनता साथ देणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर भरत गोगावले यांनी महाडमधून दणदणीत विजय मिळवला आहे. Mahad Assembly Election 2024 |