मुंबई – “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड’ आपल्या उत्तम अभिनयामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचली आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या प्राजक्ताचे असेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. प्राजक्ता नेहमीच भारतीय संस्कृती बद्दल जनजागृती करत असते.
View this post on Instagram
नुकतंच प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. जेजुरी गडावरील फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने मंदिराबाहेर येऊन भांडाराही उधळला..
View this post on Instagram
प्राजक्ताने खंडेरायाची ४२ किलो वजनाची ‘खंडा तलवार’ उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट… जय मल्हारचा जयघोष सुद्धा केला. तिचे हेच फोटो सध्या व्हायरल झाले असून, फॅन्स सुध्या तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.