Bhagwant Mann : विकासाचा प्रवास पुढे नेण्याची इच्छा; मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केले मत
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कादियान येथे एका कार्यक्रमादरम्यान भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Bhagwant Mann : पंजाब सरकारने रोजगार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आम्हाला हा विकासाचा प्रवास पुढील कार्यकाळात आणखी पुढे न्यायचा आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ मिळेल, याची खात्री करायची आहे, असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी केले.
तसेच राजकीय पक्षांचे मूल्यमापन निवडणुकीच्या काळात केल्या जाणाऱ्या खोट्या दिखाव्यांवरून न करता, त्यांच्या प्रत्यक्ष कामावरून करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कादियान येथे एका कार्यक्रमादरम्यान भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
त्यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष आपापसातील अंतर्गत कलहात व्यस्त आहे, तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यातील राजकीय समझोता शेतकऱ्यांच्या हितासाठी घातक ठरू शकतो. आम आदमी पक्षाच्या कल्याणकारी योजनांना रोखण्याचे स्वप्न पाहणे विरोधकांनी सोडून द्यावे. पंजाब सरकार मंचावरून केवळ राजकीय भाषणे देण्यापेक्षा, थेट संवादाद्वारे लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यावर (Bhagwant Mann) विश्वास ठेवते.






