मतदान केल्यानंतर भगवंत मान यांचा आरोप ; म्हणाले,”vvpat मध्ये काही..”

Bhagwant Mann । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा शेवटचा टप्पा आला तरी विरोधकांकडून या मतदानावर आक्षेप घेण्यात येत आहेत.
“vvpat मध्ये काही तरी गडबड ..” Bhagwant Mann ।
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्या नंतर त्यांच्या मतदान केंद्रावर काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भगवंत मान म्हणाले, “पंजाबचे लोक जागरूक आहेत. ते मोठ्या संख्येने मतदान करतात. आपण आपला मतदानाचा हक्क वापरला पाहिजे. मी पंजाबींना मतदान करण्याचे आवाहन करतो. बाहेर या आणि मतदान करा. तुमच्यासाठी काम करू शकणारे लोक आज मी माझ्या पत्नीसोबत मतदान केले आणि अधिकाऱ्यांनी ते बदलले.” असा आरोप त्यांनी केला.
#WATCH | After casting his vote, Punjab CM Bhagwant Mann says, “People of Punjab are aware and they vote in large numbers. We should use our right to vote. I appeal to Punjabis to come out of their homes and vote and choose good representatives who can work for you. Today I cast… https://t.co/dqeHuP5OwA pic.twitter.com/eIHr8A8XF7
— ANI (@ANI) June 1, 2024
शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान Bhagwant Mann ।
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होतंय त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशातील 6 जागा, हिमाचल प्रदेशातील 4 जागा, झारखंडमधील 3 जागा आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे .
या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, लालूप्रसाद यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्रमधून आणि अभिनेत्री कंगना राणौत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.





