सावधान…मेलवरील संवादही होतोय ‘हॅक’

पुणे – औषधांसाठी कच्च्या मालाची आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याच्या मेलवरील संवाद चोरट्यांनी हॅक केला. यानंतर साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी तयार करण्यात आला. याद्वारे व्यापाऱ्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग करुन 4 लाख 60 हजारांना गंडा घालण्यात आला.

याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक, बॅंक खातेधारक, मेलधारक व्यक्तीविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरीश भगली यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे देशात आणि परदेशात अनेक क्‍लायंट आहेत. त्यासाठी भारतातील सप्लायर्सशी संपर्क हवे असलेल्या कच्च्या मालासंदर्भात व्यवहारही ते करतात. यातील सायबर भामट्यांनी साधर्म्य असणारा बनावट मेल आयडी तयार केला. यानंतर सप्लायर आणि फिर्यादी यांचे मेल संभाषण हॅक केले. यानंतर बिलाची 4 लाख 60 हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती केली. ही घटना 14 ते 15 जानेवारीदरम्यान घडली होती. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माया देवरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.