डीपफेक व्हिडिओंपासून सावध रहा – आरबीआयचा सल्ला

Updated On:
डीपफेक व्हिडिओंपासून सावध रहा – आरबीआयचा सल्ला

मुंबई  – रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा डीप फेक तंत्रज्ञानाद्वारे व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर फिरविला जात आहे. यामध्ये रिझर्व बँकेच्या काही गुंतवणूक योजनामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे भासवले जात आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओपासून नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे, असे रिझर्व बँकेने एका पत्राकारद्वारा म्हटले आहे.

या पत्रकात रिझर्व बँकेने म्हटले आहे की, रिझर्व बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सल्ला दिला आहे असे भासवणारे डीप फेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये कथितरित्या वित्तीय सल्ला दिला जात आहे. यामध्ये नागरिकांना रिझर्व बँकेच्या विशिष्ट गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.

मात्र असा कसलाही प्रकार रिझर्व बँकेकडून किंवा रिझर्व बँकेच्या कोणत्या अधिकार्‍याकडून केला जात नाही. रिझर्व बँक अशा कुठल्या योजनेमध्ये कुणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. त्याचबरोबर रिझर्व बँकेच्या अधिकार्‍याकडून असा सल्ला देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

त्यामुळे नागरिकांनी आणि गुंतवणूकदारांनी अशा सल्ल्याकडे दुर्लक्ष करावे. त्याचबरोबर या संदर्भात माहिती मिळाली तर ती कळवावी असे सांगण्यात आले. या अगोदरही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाद्वारा असे व्हिडिओ जारी करण्यात आले होते. रिझर्व बँक याची दखल घेऊन कारवाई करत असते असे रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rupee Fall : RBI च्या निर्णयानंतर रुपयाला मोठा धक्का; डॉलरसमोर 96.75 वर घसरला

2026-10-07 21:26:24

Rupee Fall : RBI च्या निर्णयानंतर रुपयाला मोठा धक्का; डॉलरसमोर 96.75 वर घसरला

Stock Market : RBI च्या रेपो दरवाढीचा शेअर बाजाराला झटका; सेन्सेक्स 429 अंकांनी घसरला

2026-10-07 16:41:21

Stock Market : RBI च्या रेपो दरवाढीचा शेअर बाजाराला झटका; सेन्सेक्स 429 अंकांनी घसरला

RBI चा मोठा निर्णय! कर्जाचा EMI वाढणार? रेपो रेट थेट 5.50% वर

2026-10-07 11:32:50

RBI चा मोठा निर्णय! कर्जाचा EMI वाढणार? रेपो रेट थेट 5.50% वर

Repo Rate Hike: कर्ज घेणाऱ्यांना मोठा धक्का! RBI ने रेपो दर वाढवला ; गृहकर्ज-वाहन कर्ज महागणार

2026-10-07 10:19:34

Repo Rate Hike: कर्ज घेणाऱ्यांना मोठा धक्का! RBI ने रेपो दर वाढवला ; गृहकर्ज-वाहन कर्ज महागणार

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?

2026-10-05 21:38:34

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?