खबरदार, बसचा दरवाजा खुला ठेवाल तर…

पुणे  – पीएमपी बसचे स्वयंचलित दरवाजे तपासून, नादुरूस्त दरवाजे असणारी बस रस्त्यावर आणू नये. अशा घटनेत प्रवासी जखमी झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित चालकाला दोषी ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पीएमपी बसचे स्वयंचलित दरवाजे कायमचे उघडे ठेवले जात असल्याचा प्रकार थांबविण्यासाठी प्रशासनाने सर्व डेपो व्यवस्थापक आणि चालकांना आदेश दिला आहे. अनेक बसेसचे दरवाजे उघडेच असतात. याचा विचार करुन विशेषतः नव्या बसचालकांना दरवाजे बंद करुन संचलन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

दोरीने दरवाजे बांधल्यासही कारवाई
सर्व बीआरटी आणि नॉन-बीआरटी मार्गावरील बसचे स्वयंचलित दरवाजे उघड-झाप होत नाहीत. अथवा दोरीने बांधलेले असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डेपो व्यवस्थापक आणि डेपो अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.