आयपीएलवर बेटिंग; नऊ जणांना अटक
Updated On:

कोलकाता – सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या नऊ जणांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे.
कोलकाता शहरातील जाधवपूर आणि सॉल्टलेक भागातील काही इमारतींमध्ये आयपीएलवर बेटिंग सुरू असल्याची माहिती गुप्तचर सूत्रांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून ही कारवाई केली.
त्या छाप्यात रोकड, लॅपटॉप, मोबाइल फोन अशी सामग्री सापडली, ती जप्त करण्यात आली आहे. तेथे हे बेटिंग सेंटर चालवणाऱ्या लोकांचा बेटिंगच्या आंतरराज्य टोळीशी संबंध आहे काय याचा पोलीस शोध घेत आहेत.
कोलकाताच नव्हे तर अन्य शहरांमध्येही या प्रकारचे बेटिंग सध्या जोरात सुरू आहे अशा तक्रारी येत आहेत. त्यानुसार पश्चिम बंगाल पोलिसांनी त्या प्रकाराच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.





