Best High Return Stocks: रिन्युएबल पॉवर क्षेत्रातील कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. गुंतवणूकदारांकडून पॉवर सेक्टरशी संबंधित कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. मागील वर्षभरात सर्व्होटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सलाही गुंतवणूकदारांकडून पसंती मिळाली आहे. कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत मोठा नफा झाला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 616 टक्के वाढ झाली. कंपनीला 7.98 कोटी रुपयांचा नफा झाला.
वर्षभरापूर्वी याच कालावधीत सर्वोटेक रिन्यूएबल पॉवर सिस्टम्सने 1.11 कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. मागील 4 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 6000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 205.40 रुपये होती, तर नीचांकी पातळी 73.50 रुपये होती.
महसुलात मोठी वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, सर्व्होटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्सचा एकूण महसूल 315.3 टक्क्यांनी वाढून 216.83 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा महसूल 52.20 कोटी रुपये होता. कंपनीच्या खर्चात देखील याच कालावधीत 50.34 कोटी रुपयांवरून 204 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
4 वर्षात शेअर्समध्ये 6000% तेजी
सर्व्होटेक रिन्युएबल पॉवर सिस्टम्सच्या शेअर्सच्या किंमतीत मागील काही वर्षात प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. 4 वर्षात शेअर्सची किंमत तब्बल 6051 टक्के वाढली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये शेअर्सची किंमत 2.25 रुपये होती. तर 21 जानेवारी 2025 ला शेअर्स 155 रुपयांवर पोहोचला. मागच्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 93 टक्के तेजी पाहायला मिळाली. 4 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना यातून प्रचंड परतावा मिळाला आहे.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)