सॅमसंग ते मोटोरोला… 7 हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत सर्वोत्तम स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स

Best Budget Smartphone : ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सध्या ‘बिग बचत डेज सेल’ सुरू आहे. 5 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला कमी बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. सेलमध्ये तुम्हाला अवघ्या 7 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन्स खरेदी करता येईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये POCO C61, Motorola G05 आणि Samsung Galaxy F05 वर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy F05
Samsung Galaxy F05 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे. या फोनवर बँक ऑफर अंतर्गत 5 टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, 4600 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युल कॅमेरा, 6.74 इंच डिस्प्ले, हीलियो जी85 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola G05
Motorola G05 स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून 6,999 रुपयात खरेदी करता येईल. या किंमतीत फोनचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करू शकता. या फोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे, फोनची किंमत अजून कमी होईल. Motorola G05 मध्ये 6.67 इंच का एचडी+ डिस्प्ले, हीलियो G81 चिपसेट आणि 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे.
POCO C61
पोकोच्या या फोनचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येणारे व्हेरिएंट सेलमध्ये 5,899 रुपयात उपलब्ध आहे. यावर इतर ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत खूपच कमी होईल. फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात 6.71 इंच एचडी+ डिस्प्ले, 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, हीलियो G36 चिपसेट आणि 5000mAh बॅटरी दिली आहे.




