Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांना प्रोस्टेटच्या कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वतः नेतान्याहू यांनीच माध्यमांना याबाबतची माहिती दिली आहे. आपल्यावर प्रोस्टेट ग्रंथींच्या कर्करोगाचे उपचार केले जात असून आता आपली प्रकृती ठिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुमारे दिड वर्षापुर्वी आपल्यावर प्रोस्टेट ग्रंथींबाबतची शस्त्रक्रिया केली गेली आहे. त्यानंतर अडीच महिन्यांपुर्वी डॉक्टरांना छोटा ट्युमर आढळला होता. जेरुसलेममधील हडासाह रुग्णालयात रेडिएशन थेरपीद्वारे उपचारही केले गेले होते. Benjamin Netanyahu मात्र तेंव्हा ही बाब जाहीर केली गेली नव्हती. इराणविरुद्धच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये इस्रायलबाबत अधिक अपप्रचार केला जाऊ नये, यासाठी ही बाब प्रसिद्ध केली जाऊ नये, अशी विनंती आपणच स्वतः केली होती, असे नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी म्हटले आहे. आता आपली प्रकृती स्थिर असून ट्युमर हा एक छोटा वैद्यकीय मुद्दा आहे, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इराणविरुद्धचे युद्ध सुरू झाल्याच्या प्रारंभीच्या काळापासूनच नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या प्रकृतीबाबत अपसमज पसरवले जाऊ लागले होते. नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे केलेल्या प्रतिमांद्वारे इराणच्या सरकारी माध्यमांकडून पसरवले जाऊ लागले होते.