Benjamin Netanyahu: ‘आम्हाला ९/११ सारख्या दुर्घटनेतून वाचवलं’; भारतीय पायलटच्या धाडसाचं नेतान्याहूंकडून कौतुक
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, फ्लायदुबईच्या वैमानिकांनी आणि प्रवाशांनी विमानात "९/११ सारखी दुर्घटना" टाळली.

Benjamin Netanyahu: फ्लायदुबईच्या विमानाच्या कॉकपिटमध्ये झालेला कथित अपहरणाचा प्रयत्न रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय पायलट म्हणून कॅप्टन स्मित मच्छर यांची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. त्यातच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, फ्लायदुबईच्या वैमानिकांनी आणि प्रवाशांनी विमानात “९/११ सारखी दुर्घटना” टाळली,”असे म्हणत त्यांनी स्मित यांचे कौतुक केले आहे.
इस्रायलला जाणाऱ्या विमानातील एका वैमानिकाने आपल्या सहकाऱ्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे विमान हजारो फूट खाली कोसळले. नेतान्याहू यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “हल्ला झाल्यानंतर भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला.”
“दरवाजा उघडल्यानंतर इस्रायली प्रवासी यानिव हायून कॉकपिटमध्ये शिरले. व्यवसायाने प्लंबर असलेल्या हायून यांनी ओमानच्या वैमानिकाला विमानाच्या नियंत्रणांमध्ये फेरफार करताना पाहिले. नेतान्याहू म्हणाले की, त्यावेळी प्रवाशांनी कॉकपिटमधून किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकला.”अशी माहिती दिली.
प्लंबर प्रवाशाने विमानाचा ताबा घेतला Benjamin Netanyahu:
नेतान्याहू म्हणाले की, हायून यांनी विमानाची नियंत्रणे मागे खेचली. त्याचवेळी, दुसऱ्या एका प्रवाशाने आणि एका क्रू सदस्याने हल्ला करणाऱ्या वैमानिकावर मात केली. त्यानंतर राखीव वैमानिकाने कॉकपिटमध्ये प्रवेश करून विमान स्थिर केले.
इस्रायली पंतप्रधानांनी सांगितले की, ते विमानतळावर यानिव हायून यांना भेटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हयून भारतीय पायलटच्या रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. या घटनेत जखमी झालेल्या भारतीय पायलटची ओळख कॅप्टन स्मित मच्छर अशी पटली आहे.
संशयित पायलटची सौदी अरेबियामध्ये चौकशी सुरू
नेतान्याहू यांनी सांगितले की, हल्ल्याचा आरोप असलेल्या पायलटला सौदी अरेबियामध्ये ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलला या चौकशीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. ट्रम्प यांनी भारतीय पायलटला ‘हिरो’ म्हटले आणि सांगितले की, हल्ला होऊनही कॉकपिटचा दरवाजा उघडून मदत मागणे महत्त्वाचे होते. त्यांनी यानिव हयूनच्या कृतीचे कौतुकही केले.
इराणशी संबंधाची कोणतीही माहिती नाही Benjamin Netanyahu:
नेतान्याहू यांनी आपल्या संभाषणात हेही स्पष्ट केले की, या घटनेशी इराणचा संबंध असल्याचे सिद्ध करू शकेल अशी कोणतीही विशिष्ट माहिती सध्या तपासकर्त्यांकडे नाही. त्यांनी सांगितले की, सध्या अशी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
नेतान्याहू यांनी आपले पूर्वीचे अनुभवही सांगितले. १९७२ मध्ये अपहरण झालेल्या विमानातून प्रवाशांची सुटका करण्याच्या इस्रायली कमांडो मोहिमेदरम्यान आपण जखमी झालो होतो, हे त्यांनी आठवले.
१९७६ मध्ये एन्टेबे येथील ओलीस सुटका मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांचे भाऊ, योनी, शहीद झाले. “त्या वैमानिकांनी ९/११ सारखी मोठी दुर्घटना टळवली, असे त्यावेळी वाटले होते.”






