“इराणचा अणुकार्यक्रम म्हणजे एक ट्युमर जो आम्ही ” ; नेतान्याहू यांचा खामेनींना पुन्हा इशारा

Benjamin Netanyahu । इराणसोबत युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मोठे विधान समोर आले आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी यावेळी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. नेत्यानाहू यांनी, “आम्ही इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र धोक्यांचा ‘ट्यूमर’ काढून टाकला आहे, परंतु अजूनही त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.” असे म्हटले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यावेळी बोलताना,’अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि माझ्या (इस्रायल आणि अमेरिकेतील भागीदारी) भागीदारीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.’असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते पुढे म्हणाले, “अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणविरुद्ध निर्णायक निकाल मिळवला.”
बेंजामिन नेतान्याहू यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवणापूर्वीमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘आम्ही इस्रायलच्या जीवाला काही प्रमाणात धोका निर्माण करणाऱ्या दोन ट्यूमर (न्यूक्लियर ट्यूमर आणि बॅलिस्टिक मिसाईल ट्यूमर) थांबवल्या आहेत.’ असे म्हणत इराणकडे बोट दाखवले. Benjamin Netanyahu ।
बेंजामिन नेतान्याहू पुढे बोलताना, ‘ते २०,००० अशा गोष्टी (क्षेपणास्त्रे) बनवून न्यू जर्सीसारख्या छोट्या देशावर टाकण्याची योजना आखत होते. कोणताही देश इतके हल्ले सहन करू शकत नाही. जेव्हा तुमच्यासमोर दोन गोष्टी असतात ज्या तुम्हाला मारू शकतात, तेव्हा तुम्ही काय करावे? तुम्हाला त्या काढून टाकाव्या लागतील आणि आम्ही आमच्या संयुक्त प्रयत्नांनी ते केले.’असे म्हणाले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इशारा दिला की, ‘जेव्हा तुम्ही ट्यूमर काढता तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की तो पुन्हा परत येऊ शकत नाही. तुम्हाला सतत परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल जेणेकरून कोणीही तो परत आणण्याचा प्रयत्न करू नये.’
ते म्हणाले की,”अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेचे चित्र बदलले आहे आणि यामुळे इस्रायल आणि त्याच्या अरब आणि मुस्लिम शेजारी देशांमधील अब्राहम करार पुढे नेण्याची संधी मिळाली आहे. Benjamin Netanyahu ।
नेत्यानाहू यांनी यावेळी बोलताना, ‘मला विश्वास आहे की इराण आमच्या संयमाची परीक्षा घेणार नाही, कारण ती त्यांची चूक असेल.’ जेव्हा बेंजामिन नेतान्याहू यांना विचारले गेले की ते इराणमधील राजवट बदलाचे समर्थन करतात का, तेव्हा नेतन्याहू यांनी उत्तर दिले, ‘ते इराणच्या लोकांवर अवलंबून आहे.’ असे म्हटले.

