Bengaluru News : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये (Bengaluru News) बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना आणि गारपीट होत असल्याने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. याच पावसामुळे शिवाजीनगर येथील ऐतिहासिक बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयच्या (Bengaluru News)कंपाऊंड भिंतीचा एक मोठा भाग अचानक कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात हाहाकार माजवला. रस्त्यावरील दुकानदार, वाटसरू आणि काही मुले पावसापासून बचावण्यासाठी (Bengaluru News) रुग्णालयाच्या भिंतीजवळ आश्रय घेत होते. त्याचवेळी भिंत कोसळल्याने तेथे उभे असलेले लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. मृतांमध्ये एक ६ वर्षीय मुलगी, दोन महिला (त्यापैकी दोन केरळमधील), चार पुरुष यांचा समावेश आहे. Bengaluru News दुर्घटनेमागील कारण अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, सततचा मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपीट यामुळे भिंतीची मजबूती कमी झाली होती. रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या काही बांधकामामुळेही भिंतीला ताण पडला असावा, असे सूतोवाच करण्यात आले आहे. भिंत कोसळताच बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींवर उपचार या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सात जणांवर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. तीन जखमी केरळमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलिस, बीबीएमपी (बृहन्मुंबई महानगरपालिका समकक्ष) आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेतला. भिंत कोसळण्याबाबत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना फटकारले आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची तात्काळ मदत (एक्स-ग्रेशिया) जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला.तसेच शिवाजीनगरचे आमदार रिझवान अरशद यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.