Bhumi Pednekar : भारतात ‘स्त्री’ म्हणून भीती वाटते; अभिनेत्री भूमि पेडणेकरचे विधान चर्चेत

अभिनेत्री भूमि पेडणेकर तिच्या मेरे हसबेंड की बीवी चित्रपटाला घेऊन जोरादार प्रमोशन करताना दिसत आहे. २१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भूमिने या चित्रपटाला घेऊन न्यूज चॅनेलवर अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, तिने नुकत्याच एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीची जोरदार चर्चा होत आहे. या मुलाखदरम्यान भूमिने महिला विरोधी हिसेंला घेऊन आपलं स्पष्ट मत मांडल आहे. तिने केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. मल्लाळम चित्रपटसृष्टीत महिलांचा छळ आणि लैगिंक शोषणाविषयी देखील आपलं प्ररखड मत व्यक्त केले आहे.
एबीपी नेटवर्कच्या आयडियाज अॅाफ इंडिया २०२५ मध्ये भूमिने तिला नेहमीच तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेविषयी भीती वाटत राहत असल्याच म्हटलं आहे. आज भारतात एक स्त्री म्हणून मला भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. माझ्यासोबत मुंबईत राहणारी माझी धाकटी चुलत बहीण कॉलेजला जाते, तेव्हा मला भीती वाटते आणि ती रात्री 11 वाजेपर्यंत घरी आली नाही तर मला काळजी वाटत असल्याची ते म्हणाली.
जेव्हा पहिल्या पानावर फक्त महिलांविरोधात हिंसेच्या बातम्या येतात तेव्हा देखील ही एक समस्या आहे. ही काही आताची बातमी नाही. असं रोजं होतं असल्याची ती म्हणाली. तसेच जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टबद्दल बोलातना ती म्हणाली, भारतीय समाजाचा भाग आहे. तिथे योग्य त्या प्रक्रियाला फॉलो करण्यात आलं आहे. ज्यातून धक्का बसेल अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत.
आगामी प्रोजेक्टची उत्सुकता
भूमि पेडणेकर तिच्या हसबेंड की बीवी चित्रपटाला घेऊन उत्सुक आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन या चित्रपटातील कलाकारांकडून करण्यात येत आहे. २१ फेब्रुवारीला मेरे हसबेंड की बीवी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय भूमि तिच्या आगामी प्रोजेक्टला घेऊन उत्सुक असून दलदल या वेबसिरीजमध्ये ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.





