हेमा मालिनी यांची अनोख्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या उपायांनी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच ड्रिमगर्ल अर्थात हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचाराची सुरुवात मथुरेतील गोवर्धन परिसरातील एका शेतातून केली. यावेळी हेमा मालिनी यांनी शेतातील गहू कापण्यास शेतकऱ्यांची मदत केली. कापलेल्या गव्हाच्या पेंढ्याही हेमा मालिनी यांनी स्वतः उचलून बाजूला ठेवल्या. हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

दरम्यान, हेमा मालिनी यांच्यासाठी यंदाची निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसणार आहे. त्यांच्या विरोधात महागठबंधनतर्फे राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार मोठे आव्हान उभे करण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसनेही ब्राह्मण उमेदवार देऊन ही लढत अधिक चुरशीची बनवली आहे. राष्ट्रीय लोकदलाने पहिल्यांदाच एका ठाकूर उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. त्यामुळे हेमा मालिनी यांची अनोखी प्रचार पद्धत मतदारांना आकर्षित करते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.