Mangesh Kalokhe death case : दोन दिवसांपूर्वी अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसिवेका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घूणपणे हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, आता या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतील, इतक्या निर्घूणपणे मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकरणातील नऊ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात देखील एकच खळबळ उडाली असून, राजकारण तापले आहे. ज्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली त्या दिवशी नेमकं काय घडले होते याची देखील माहिती समोर आली आहे. मंगेश काळोखे हे आपल्या मुलींना शाळेत सोडून घरी परतत असताना, अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुरूवातीला त्यांची गाडी अडविण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्यावर झडप घालताना दिसत आहेत. मंगेश काळोखे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, हल्लेखोर एकामागून एक वार त्यांच्यावर करत राहिले. या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, काळीज पिळवटून टाकणारी आहे. रायगड (खोपोली) : मुलींच्या शाळेतून परतताना हल्ला, जीवाच्या आकातांने पळाले, पण…; खोपोलीत मंगेश काळोखेंसोबत काय घडलं? CCTV समोर pic.twitter.com/KbYDeQuArn — Prashant Patil (@Prashant_P95) December 28, 2025 एकनाथ शिंदेंनी घेतली पीडित कुटुंबांची भेट या घटनेनंतर शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर दिले. तसेच हे गंभीर प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्यात येईल, अशी ग्वाही देखील शिंदेंनी दिली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते. हा गुन्हा अतिसंवेदनशील स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्याची मागणी लोकांकडून केली जात होती. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मोठ्या शिताफीने संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या शोधारार्थ पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे यांची हत्या राजकीय वादातूनच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उमर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशी एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा : भाजपा ‘लाडक्या बहिणींच्या’ पाठीशी राहणार