महाराष्ट्रातील सभेआधी पंतप्रधान मोदींनी केले मराठीत ट्विट 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची पहिली सभा वर्धा येथे होणार आहे. परंतु, या सभेला येण्याआधी मोदींनी मराठीतून ट्विट केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार! आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या 48 जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यात भाजप-शिवसेना युती देखील मागे नाही. यासाठीच मोदी राज्यात 8 सभा घेणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.