Bihar Elections 2025 | बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा अंतिम निकाल शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता होईल. नियमानुसार, सर्वप्रथम पोस्टल बॅलेटची अर्थात टपाल मतपत्रिकांची गणना केली जाईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. बिहार निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. बाल दिवस साजरा करताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आठवण करून दिले जाते. या निमित्ताने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आठवण केली आहे. एक्स-पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी लिहिलंय की, “भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली…” तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नेहरू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Bihar Elections 2025 | नेहरू यांचा जन्मदिन ‘बाल दिवस’ म्हणून साजरा दरम्यान, १४ नोव्हेंबर ही तारीख भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा दिवस ‘बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. उत्तर प्रदेशातील तत्कालीन इलाहाबाद (प्रयागराज) येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी जन्मलेल्या जवाहरलाल नेहरू यांना मुलांवर विशेष प्रेम होते आणि मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारत असत. Bihar Elections 2025 |