Beed News : बीडमध्ये दहशत निर्माण करणारा खोक्या भाई नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या

बीड : मागच्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे तो इथल्या गुन्हेगारीमुळे. काही महिन्यांपूर्वी याच बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही आरोपींनी हत्या केली होती. यादरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
संतोष देशमुख यांचे प्रकरण ताजे असताना काही दिवसांपूर्वी बीडच्या शिरूरकासार तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम बॅटच्या साह्याने मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याच्या सोबत अजून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणारा व्यक्ती भाजपाचा पदाधिकारी सतीश भोसले खोक्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 324, 323, 506, 34 प्रमाणे स्वतः पोलीस फिर्यादी होऊन सुमोटो नुसार फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अकराच्या दरम्यान हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भोसलेचा शिरूर पोलिसांकडून शोध सुरु आहे.
कोण आहे सतीश भोसले ऊर्फ खोक्या भाई?
सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे.
गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे.
शिरूर कासार भागात खोक्या नावाने त्याची दहशत आहे.
स्थानिक पातळीवर गोल्डमॅन म्हणून ओळख आहे.
पार्टी खोक्या आणि गोल्डमॅन ही सतीश भोसलेची टोपणनावे आहेत.
गाड्यांचा ताफा आणि गराड्यात राहत असल्यामुळे सतीश भोसले मोठ्या प्रमाणात चर्चेत
सतीश भोसलेची राजकीय पाठबळ, गुंडगिरी आणि दहशतीची पार्श्वभूमी आहे.





